जनावरांचा बळी घेण्याच्या प्रथेवर नेपाळमध्ये बंदी

गधीमाई महोत्सवात होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या जनावरांचा बळी देण्याच्या कार्यक्रमावर बंदी आणली आहे.

Updated: Jul 29, 2015, 02:25 PM IST
जनावरांचा बळी घेण्याच्या प्रथेवर नेपाळमध्ये बंदी title=

नेपाळ : गधीमाई महोत्सवात होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या जनावरांचा बळी देण्याच्या कार्यक्रमावर बंदी आणली आहे.

दर पाच वर्षांनी भरणाऱ्या या महोत्सवात जनावरांचा मोठ्या प्रमाणावर बळी दिला जातो.

गधीमाई देवळाच्या ट्रस्टींनी हा बंदीचा निर्णय मंगळवारी घेतला आहे, तसेच जनावरांना महोत्सवात न आणण्याबद्दल भक्तांना आवाहन केले आहे.

जनावरांचा बळी देण्याची ही प्रथा नेपाळमध्ये सुमारे ३०० वर्षापासून चालत आलेली आहे. जनावरांचा बळी यापुढे गधीमाई महोत्सवामध्ये दिला जाणार नाही, तसेच २०१९ साली होणाऱ्या गधीमाई महोत्सव हा हत्याकांडमुक्त असेल, अशी घोषणा गधीमाई देवळाच्या ट्रस्टींनी केली आहे. 

चांगल्या आयुष्यासाठी म्हणून कित्येक पिढ्यांपासून यात्रेकरू गधीमाई देवीला जनावरांचा बळी देत आहेत. पण आता या २१व्या शतकात ही पद्धत बदलली, तसेच हत्या आणि हिंसा याच्या जागी शांततेने आराधना करून उत्सवाचा आनंद लुटला पाहिजे, असे वक्तव्य देवळाच्या ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र शाह यांनी केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.