आकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा

जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.

Updated: Jul 29, 2015, 01:04 PM IST
आकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा title=

नवी दिल्ली : जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.

या व्हिडिओची क्वॉलिटी खूपच खराब आहे. परंतु, यामुळे एलियन्स अस्तित्वात असल्याच्या चर्चेला बळ मिळालाय. या व्हिडिओत जवळपास १० गोळे हवेत उडताना दिसत आहेत. 

२ मिनिटांच्या या व्हिडिओत गोल आकाराच्या वस्तू हवेत नाचताना दिसतायत. अनेक लोकांनी या वस्तू म्हणजे यूएफओ (Unidentified flying object) असल्याचा दावा केलाय. एका जपानी चॅनलद्वारे हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

उल्लेखनीय म्हणजे, जून महिन्यातही लंडनमध्ये अशाच काही गोष्टी दिसल्या होत्या. परंतु, या वस्तू नेमक्या काय होत्या? हे अजूनही गूढच आहे. नासानंही जुलै महिन्यात सर्वात मोठ्या यूएफओचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले होते. या यूएफओला सूर्याच्या अगदी जवळून जाताना पाहिलं गेलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.