ग्रीस दिवाळखोरीत, पर्यटकांना सुगीचे दिवस

ऐतिहासिक जुन्या वास्तू, निळाशार समुद्र... समुद्रानं वेढलेले हजारो आयलँड आणि जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा ग्रीस तुम्ही पाहू इच्छिता.  तर तुमच्यासाठी हाच चांगला काळ आहे.

Reuters | Updated: Jul 4, 2015, 10:04 AM IST
ग्रीस दिवाळखोरीत, पर्यटकांना सुगीचे दिवस title=

अथेन्स : ऐतिहासिक जुन्या वास्तू, निळाशार समुद्र... समुद्रानं वेढलेले हजारो आयलँड आणि जगावर राज्य करण्याची इच्छा बाळगणारा सिकंदर म्हणजे अलेक्झांडरचा ग्रीस तुम्ही पाहू इच्छिता.  तर तुमच्यासाठी हाच चांगला काळ आहे.

आर्थिक मंदीत असलेल्या ग्रीसमध्ये व्यवसायात मंदी आहे. मात्र त्याचाच फायदा पर्यटनाला होणार आहे. कारण कमी प्रतिसादामुळे हॉटेलच्या दरात १५ ते २० टक्के कपात झालीय. याआधी हॉटेलचे दर ८ ते १० हजार रुपये होतं. तेच आता ६ ते ८ हजारांच्या दरम्यान आहे.

सोबतच क्रूजद्वारे आयलँडची सफारी असो की एक्रोपोलिस सारखं ऐतिहासिक स्थळ पाहाण्यासाठी गाडी भाड्यानं घेणं असो. आधीच्या तुलनेत सध्या बरीच स्वस्ताई पाहायला मिळतेय. यूरोमध्येही वर्षभरातली मोठी घट झालीय. गेल्या वर्षी एक युरोची किंमत ८० रुपये होती. तोच युरो आता ७० रुपये झालाय. त्याचाच फायदा घेत अनेक ट्रॅव्हल्स आणि टूरिझम कंपन्या ग्रीससाठी खास पॅकेज तयार करतायत. 

सध्या भारत ते ग्रीस अशा तीन दिवसांच्या पॅकेजसाठी एका व्यक्तीसाठी ४५ ते ५० हजार खर्च येतो. जो कमी होऊन ४० ते ४५ हजार एवढा होऊ शकतो. त्यामुळेच ग्रीस पाहाण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधल्या जाणकारांनी म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.