नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनच्या साडेतीन वाजता निकालाची सुनावणी सुरू होईल.
तीन दिवसांपूर्वी कोर्टानं भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतली होती. भारतानं कुलभूषण यांना दिली गेलेली शिक्षा गैर असून ती तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यालाही भारतानं जोरदार विरोध केला आहे.