TCS कंपनी ठरली जगातील सर्वात पावरफूल आयटी ब्रँड

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही आज आयटी सर्व्हिस देणारी जगातील सर्वात पावरफूल कंपनी ठरली असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. 

Updated: Feb 3, 2016, 10:04 PM IST
TCS कंपनी ठरली जगातील सर्वात पावरफूल आयटी ब्रँड title=

लंडन : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही आज आयटी सर्व्हिस देणारी जगातील सर्वात पावरफूल कंपनी ठरली असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. 

बँड फायनान्स २०१६ च्या वार्षिक अहवालानुसार जगातील हजारो आयटी कंपन्यांना मागे टाकत टीसीएस ने पहिला क्रमांक पटकावला आहे. 

स्टाफ सॅटिसफॅक्शन, ग्राहकांसोबतचा व्यवहार, काम करण्याती पद्धत, प्रामाणिकता अशा सगळ्या गोष्टींच्य़ा आधारावर ७८.३ गुण मिळवत टीसीएस हा जगातील सर्वात मोठा बँड झाला आहे. 

मागील ६ वर्षांमध्ये टीसीएस ही झपाट्याने प्रगती करणारी कंपनी ठरली आहे. टीसीएस मध्ये एकूण ३,४४,००० लोकं काम करतात.