नवी दिल्ली : दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेसाठी स्वराज सध्या पाकिस्तानात गेल्या आहेत.
अधिक वाचा - हॅक ट्वीटर अकाऊंटवरून स्वराज यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट
पाक सरकारचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ आणि स्वराज यांची काल संध्याकाळी इस्लामबादमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आज रात्री मायदेशी परत येण्याआधी स्वराज यांचा पाकच्या पंतप्रधानांना भेटणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानाच्या समस्या निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेचा पुढचा टप्पा २०१६ मध्ये भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
अफगानिस्तानावर होणाऱ्या या संमेलनात १४ भागीदार देश, १७ सहयोगी देश आणि १२ आंतरराष्ट्रीय तसंच क्षेत्रीय संघटनांचं उच्च स्तरीय प्रतिनिधिमंडळाचा समावेश आहे.
'दोन्ही देशांतील संबंध सुधारायला हवेत आणि पुढे वाटचाल करायला हवी... हाच संदेश घेऊन मी आलेय' असं त्यांनी पाकिस्तानात झाल्यानंतर म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.