नवी दिल्ली : स्पेनच्या मिरीया लालागुना रोयो हिनं मिस वर्ल्ड 2015चा किताब जिंकलाय. चीनच्या सान्या शहरात 65 वी मिस वर्ल्ड़ स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत रनर-अप ठरली मिस रशिया तर फर्स्ट रनर-अपचा मान मिस इंडोनेशियाला मिळालाय.
किताब जिंकणारी मिरीया लालागुना ही 23 वर्षीय रोयो स्पॅनिश मॉडेल आहे. रोयो ही बार्सिलोनाची रहिवाशी असून इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे. मिस इंडिया अदिती 65व्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत जगभरातल्या 108 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता..