पाकिस्तान 16 देशांसोबत करणार लष्करी सराव

सैन्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पाकिस्तान पुढील आठवड्यात लष्करी सराव करणार आहे. यात 16 देश सहभागी होणार आहेत. 

Updated: Oct 14, 2016, 02:41 PM IST
पाकिस्तान 16 देशांसोबत करणार लष्करी सराव title=

लाहोर : सैन्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पाकिस्तान पुढील आठवड्यात लष्करी सराव करणार आहे. यात 16 देश सहभागी होणार आहेत. 

श्रीलंकेतून 25 सदस्यीय दल या लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी गुरुवारी पाकिस्तानात दाखल झाले. सहा दिवस हा सराव सुरु राहील. 16 देश या लष्करी सरावात सहभागी होतील. दरम्यान हे 16 देश कोणते असणार आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. 

यापूर्वी 27 सप्टेंबरमध्ये पाकिस्तान आणि रशियाच्या सैन्याने संयुक्त लष्करी सराव केला होता. हा सराव 10 ऑक्टोबरपर्यंत चालला होता.