'पगडी'मुळे अमेरिकेत शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखलं...

आपली पगडी उतरवण्यास नकार देणाऱ्या एका शीख अमेरिकन अभिनेत्याला न्यूयॉर्कला जाताना विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.

Updated: Feb 9, 2016, 02:17 PM IST
'पगडी'मुळे अमेरिकेत शीख अभिनेत्याला विमानात चढण्यापासून रोखलं... title=

न्यूयॉर्क : आपली पगडी उतरवण्यास नकार देणाऱ्या एका शीख अमेरिकन अभिनेत्याला न्यूयॉर्कला जाताना विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.

पगडीसहीत आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत या अभिनेत्यानं आपल्याला विमानात चढण्यापासून रोखण्यात आल्याचं म्हटलंय. 

वारिस अहलूवालिया असं या ४१ वर्षीय अभिनेत्याचं नाव आहे. मेक्सिकोच्या दौऱ्यावर गेलेला वारिस न्यूयॉर्कला परतत असताना हा प्रकार घडलाय. 

काल सकाळी जवळपास साडे पाचच्या सुमारास मेक्सिको सीटीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एरोमेक्सिको विमानसेवेच्या काऊंटरवर पोहचल्यानंतर वारिसला एका कोडसहीत प्रथम श्रेणीचा बोर्डिंग पास देण्यात आला. या कोडचा संकेत दुसऱ्या एका तपासणीतून जावं लागणार, असा होता असं अहलुवालिया यांनी म्हटलंय. 

या तपासणीदरम्यान आपल्याला विमानात चढण्यासाठी पगडी उतरवण्यास सांगितलं गेलं. परंतु, याला त्यांनी नकार दिल्यावर एरोमेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एका बाजुला उभं राहण्यास सांगितलं. 

यानंतर इतर प्रवासी तर या विमानात चढले परंतु, अहलुवालिया यांना मात्र या विमानात चढण्यापासून रोखण्यात आलं.