शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी

पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांची बीसीसीआय सोबतची बैठक उधळून लावण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, पाकिस्तानातही तिळपापड झाला आहे.

Updated: Oct 20, 2015, 12:56 PM IST
शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी title=

मुंबई : पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांची बीसीसीआय सोबतची बैठक उधळून लावण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, पाकिस्तानातही तिळपापड झाला आहे.

यावरून पाकिस्तानातील पंजाब प्रांतच्या विधानसभेत शिवसेनेच्या राड्याचा निषेध करण्यात आला, तसेच शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करा, अशी मागणी थेट संयुक्त राष्ट्रांकडेच करण्यात आली आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे आमदार फैज मलिक यांनी शिवसेनेच्या विरोधात हा प्रस्ताव मांडला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरीयार खान यांची बैठक भारतीय क्रिकेट मंडळाचे शशांक मनोहर यांची भारत-पाकिस्तान सामन्यांवर मुंबईत चर्चा होणार होती, चर्चा होणार याआधीच शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयात धुडगूस घातला यामुळे ही चर्चा रद्द झाली. याचा राग पाकिस्तानातही दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.