आता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’

ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 31, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com,बीजिंग
ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा विकत देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
प्रदूषणाने ग्रासलेल्या चीनमध्ये आता जगण्यासाठी चक्क शुद्ध हवेची (ऑक्सिजन) विक्री सुरू झाली आहे. ‘सॉफ्ट ड्रिंक’च्या कॅनमधून विकल्या जाणाऱ्या हवेची किंमत पाच चिनी युवान इतकी आहे.
डबाबंद हवेच्या विक्रीची कल्पना एका अब्जाधीश चेन गुवांगबियो यांनी प्रत्यक्षात आणलीय, असे ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषणाने प्रश्न किती गंभीर झाला आहे, याची प्रचिती आल्याने ऑक्सीजन विकत घेण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.