अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध

अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रह आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलतज्ज्ञांच्या टीमनं अशा तीन ग्रहांचा शोध लावलाय ज्यांचं नेचर हे पृथ्वीशी मिळतं-जुळतं आहे. 

PTI | Updated: May 3, 2016, 01:16 PM IST
अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रहांचा शोध  title=
छाया : एपी

मुंबई : अंतराळात पृथ्वीप्रमाणेच आणखी तीन ग्रह आहेत.  आंतरराष्ट्रीय खगोलतज्ज्ञांच्या टीमनं अशा तीन ग्रहांचा शोध लावलाय ज्यांचं नेचर हे पृथ्वीशी मिळतं-जुळतं आहे. त्यामुळेच या तीन ग्रहांवहर जीवनसृष्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

तुम्ही चित्रपटात एलियन पाहिलेच असतील. दुस-या ग्रहावर जीवन असल्याचं तुम्ही ऐकलंही असेल. पण या केवळ शक्यता आहेत. आणि त्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नव्हता. आता मात्र खगोल तज्ज्ञांनी पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवर जीवन असल्याचं मान्य केलंय.

वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमनं पृथ्वीसारख्या तीन ग्रहांचा शोध लावला. हे ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेर आहेत. याठिकीणी पृथ्वीसारखं जीवनही असण्याची शक्यता आहे. खगोलतज्ज्ञांच्या मते, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर पहिल्यांदाच जीवन असल्याच्या खुणा सापडल्यात. 

हे तीन ग्रह पृथ्वीच्या आकारासारखेच आहेत. हे ग्रह पृथ्वीच्या एवढे जवळ आहेत. की, तंत्रज्ञानाच्या मदतीनं याचा अभ्यासही केला जाऊ शकतो. बेल्जियमच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीगचे खगोलतज्ज्ञ  मायकल गिलोन आणि त्यांच्या टीमनं या ग्रहांचा शोध लावलाय.