म्हणून शर्टच्या मागे असतं लूप

शर्टच्या मागच्या बाजूला असलेला लूप आपण नेहमीच बघतो. फॅशन म्हणून हा लूप लावण्यात आला असल्याचा अनेकांचा समज आहे, पण फॅशन नाही तर शर्टमागे हा लूप असण्यामागे कारण आहे. 1960च्या दशकापासून पुरुषांच्या शर्टवर लूप लावायला सुरुवात झाली.

Updated: Nov 4, 2016, 04:38 PM IST
म्हणून शर्टच्या मागे असतं लूप  title=

मुंबई : शर्टच्या मागच्या बाजूला असलेला लूप आपण नेहमीच बघतो. फॅशन म्हणून हा लूप लावण्यात आला असल्याचा अनेकांचा समज आहे, पण फॅशन नाही तर शर्टमागे हा लूप असण्यामागे कारण आहे. 1960च्या दशकापासून पुरुषांच्या शर्टवर लूप लावायला सुरुवात झाली.

सुरुवातीला हे लूप पूर्व किनाऱ्यावरच्या खलाशांच्या शर्टसाठी बनवण्यात आले.  हँगरला शर्ट लटकवण्याऐवजी हूकला हे लूप अडकवल्यामुळे शर्टना सुरकुत्या पडल्या नाहीत. यामुळे खलाशांना दुसऱ्या दिवशीही लूप असलेले हे शर्ट घालता येऊ लागले.

खलाशांचा हा ट्रेंड नंतर अमेरिकेमध्ये आला आणि तिथेही अशाप्रकारचे शर्ट बनवण्यात येऊ लागले. यानंतर व्यायामशाळेमध्ये असलेल्या जीम लॉकर्समध्ये पुरुष व्यायामावेळी शर्ट लूपमध्ये अडकवायला लागले. यामुळे काही ठिकाणी याला लॉकर लूपही म्हणतात.