नवी दिल्ली : तुम्हा आमीर खानचा गझनी पाहिला असेल. ज्यात आमीर खान अर्थातच 'गझनी'ची स्मरणशक्ती केवळ ५ मिनिटांत गायब होते. हे फिल्ममध्ये बघायला ठिक आहे... पण, हेच जर खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलं तर... होय, एका मुलीच्या रिअल आयुष्यातही असंच घडतंय.
क्रिस्टीना कोर्प असं या मुलीचं नाव... सध्या स्वत:च्या लग्नाची स्वप्नं पाहणाऱ्या क्रिस्टीनाला भीती वाटतेय की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती सारं विसरून जाईल कारण तिची स्मरणशक्ती खुपच कमकुवत आहे.
वयाच्या सतराव्या वर्षी झालेल्या एका अपघातानंतर क्रिस्टिनाच्या स्मरणशक्तीनं तिची सोबतच सोडून दिलीय. तिच्या डोक्यावर असा काही परिणाम झालाय ज्यामुळं ती जेव्हा सकाळी उठते तेव्हा मागच्या दिवसातील साऱ्या गोष्टी विसरून जाते. ती एका कार अपघातातून थोडक्यात बचावली पण १३ आठवडे कोमामध्ये होती. त्यानंतर तिच्यासोबत असंच होतंय.
२८ वर्षीय क्रिटीनाचे आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. तिची ओळख २८ वर्षीय स्वीनीशी झाल्यावर त्यांची ही चिंताही दूर झालीय. क्रिस्टीनाला हा आजार असूनही स्वीनी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे.
आता क्रिस्टीना रोज संध्याकाळी नोट लिहून ठेवते ज्यामुळे मागच्या दिवसातील गोष्टी लक्षात राहातील. लग्नाची तयारी करताना तिनं प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं लग्नातील प्रत्येक गोष्ट तिला लक्षात राहील... तसंच तीनं अनेक गोष्टी आपल्या कॅमेऱ्यातही फोटोच्या माध्यमातून कैद केल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.