मुंबई : आपण बऱ्याचदा मित्राला उद्देशून 'अरे यार' असं बोलून जातो. पण आता हा शब्द केवळ भारतीय शब्द राहिला नसून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली गेलीय. नुकताच या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केला गेलाय. त्यामुळे भारतीय भाषांमधील या शब्दाला जागतिक पातळीवर मान मिळालाय.
'अरे यार' सोबतच 'चूडीदार', 'भेलपुरी', 'ढाबा' या शब्दांचा समावेशही ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये करण्यात आलाय. या शब्दांचा वापर इंग्रजी भाषेत सर्रास केला जातोय ही आश्चर्याची बाब आहे.
भाषेच्या संशोधनातून हे शब्द इंग्रजी भाषेत सर्रासपणे वापरले जातात तसंच त्यांचं आपलं असं सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महत्त्वही आहेच, असं ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या सल्लागार तसेच संपादक डॉ. डानिका सालझर यांन म्हटलंय.
या शब्दांचा वापर इंग्रजी भाषेत १८४५ पासून केला जातोय तसेच 'चूडीदार' या शब्दाचा वापर १८८० मध्ये केला गेलाय. या शब्दांना इंग्रजीमध्ये स्थान मिळण्यास तब्बल १३५ वर्ष लागली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.