मोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे.  गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. 

Updated: Aug 16, 2015, 10:55 AM IST
 मोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं... title=

आबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे.  गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. 

पंतप्रधान मोदींचा यूएई दौरा विशेष महत्त्वाचा आहे.. त्याला चार कारणं आहेत..

पहिलं कारण - भारतात गुंतवणूक

यूएईकडे गुंतवणूकीसाठी 800 अब्ज डॉलर.. जे भारतात गुंतवणूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे.. चीनची अर्थव्यवस्था सध्या दोलायमान आहे.. कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या आहेत.. त्यामुळं यूएई गुंतवणुकीसाठी नवे पर्याय शोधतोय.. अशात पंतप्रधान मोदी हीच गुंतवणूक भारताकडे वळवण्यात यशस्वी ठरले तर ते मोठं यश ठरेल.. 2012 साली यूएईनं भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रात 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक गेली होती.. मात्र यावेळी भारताची गरज मोठी आहे. भारताला पुढील पाच वर्षांसाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे.. 

दुसरं कारण - द्विपक्षीय व्यापारात वृद्धी
चीन आणि अमेरिकेनंतर व्यापार करणारा भारत तिसरा मोठा देश आहे.. भारताचा द्विपक्षीय व्यापार सध्या 70 अब्ज डॉलर इतका आहे..2030 सालापर्यंत यूएईकडून सर्वाधिक उत्पादित वस्तू आयात करणारा देश भारत असेल असं यूएई सरकारनं म्हटलंय.. 

तिसरं कारण - यूएईमध्ये 26 लाख भारतीय
यूएईमध्ये 26 लाख भारतीय राहतात.. ते दरवर्षी भारतात यूएईमधून 13 अब्ज डॉलर पाठवतात.. यूएईमध्ये काम करणा-यांमध्ये सर्वाधिक भारतीय कामगार वर्गाचा समावेश आहे.. यूएईमध्ये या कामगारांची कामाची परिस्थिती बिकट आहे..
या भारतीयांना पंतप्रधान मोदींकडून ब-याच आशा आहेत.. 

चौथं कारण - आखाती देशांशी चांगले संबंध
भारतानं गल्फकडे कानाडोळा केला.. कारण एकीकडे भारतानं इराणच्या जवळ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.. तर दुसरीकडे इस्त्रायलची जवळीकही दिसून आली.. अरब देश आणि इस्त्रायलच्या वादातून भारतानं बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला नाही.. गुंतवणूक आणि दहशतवादविरोधी सहकार्य करार मार्च 2013 पासून प्रलंबित आहे ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा यूएई दौरा ऐनवेळी रद्द झाला.. 
अशावेळी मोदींचा हा दौरा त्यांच्या इस्त्रायल दौ-याआधी संतुलन राखण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.