शेजारचा देश दहशतवादाचा गड, मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र

गोव्यात भरलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.

Updated: Oct 16, 2016, 04:39 PM IST
शेजारचा देश दहशतवादाचा गड, मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र title=

गोवा : गोव्यात भरलेल्या आठव्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. शेजारील देश दहशतवादाचा गड असून दहशतवाद्यांना तिथं प्रोत्साहन मिळत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय.

वाढता दहशतवाद जगासाठी धोकादायक असून ब्रिक्स देशांनी एकजूटता दाखवणं गरजेचं असल्याचं मोदींनी म्हटलं. ब्रिक्स परिषदेच्या दुस-या आणि शेवटच्या दिवशी मोदींनी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. गोवा ब्रिक्स परिषद भविष्यासाठी दिशादर्शक ठरल्याची प्रतिक्रिया मोदींनी परिषदेच्या समारोपानंतर व्यक्त केली.