विमान हवेत; पायलट मात्र झोपेत!

विमानाचे उड्डाण सुरूंय आणि पायलट झोपले तर? हे अकल्पित घडलंय ब्रिटिश एअरलाईन्सच्या एका विमानात!

Updated: Sep 28, 2013, 06:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ब्रिटन
विमानाचे उड्डाण सुरूयं आणि पायलट झोपला तर? हे अकल्पित प्रत्यक्षात घडलंय ब्रिटिश एअरलाईन्सच्या एका विमानात!
ब्रिटिश एअरलाईन्सचं विमान 'एअरबस ए ३३०' हे जवळजवळ ३२५ प्रवाशांना घेऊन उड्डाण करत असताना एक पायलट झोपून उठल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की आपल्यासोबतचा दुसरा पायलटही झोपलाय.
'द इंडिपेंडट' या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, दूर अंतरावरच्या या विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानाला ऑटो मोडमध्ये ठेऊन... एका वेळी एका पायलटने डुलकी काढताना दुसऱ्या पायलटनं मात्र विमानाकडे लक्ष द्यायचं... असं या दोन पायलटनं ठरवलं होतं. मात्र, एक पायलट झोपेतून उठल्यावर त्याच्या लक्षात आलं, की दुसरा पायलटही झोपलाय. दुसरा पायलट किती वेळ झोपला होता? हे त्याला कळलं नाही.

या घटनेविषयी दोन्ही पायलटनी स्वेच्छेनं युकेच्या सिव्हिल एव्हिएशन अॅथॉरिटीला माहिती दिलीय. 'सीएए'ने मात्र या विमानाबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय तसंच पायलटविरूध्द कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्याता आलंय. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत... यासाठी प्रयत्न केले जातील, असं 'सीएए' ने सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.