इंडोनेशियात ७.२ रिस्टर स्केलचा भूकंप

पूर्व इंडोनेशियात पापुआमध्ये सकाळी भूकंपाचा जोरदार हादरा बसला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भूकंपाची रिस्टर स्केलवर  ७.२ ची नोंद करण्यात आली आहे.

ANI | Updated: Jul 28, 2015, 01:56 PM IST
इंडोनेशियात ७.२ रिस्टर स्केलचा भूकंप title=

पापुआ : पूर्व इंडोनेशियात पापुआमध्ये सकाळी भूकंपाचा जोरदार हादरा बसला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भूकंपाची रिस्टर स्केलवर  ७.२ ची नोंद करण्यात आली आहे.
 
पूर्व इंडोनेशिया पापुआपासून ७५ किमीपर्यंत या भूकंपाचे केंद्रबिंदू आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. रिस्टर स्केलवर ७.२ अशी भूकंपनाची नोंद करण्यात आली आहे.

सकाळी ४.४१ मिनिटांना भूकंपाचा धक्का जाणवला. पापुआपासून ७५ किलोमीटर दक्षिण-पूर्वेच्या ४९ किमी अंतरावर याचे केंद्रबिंदू आहे. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

भूकंपाचा जोरदार हादरा बसल्याने अनेक लोक घराबाहेर पळालेत. दरम्यान, या भूकंपाने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.