३०० प्रवासी, ३३ हजार फूट उंच, पायलटनं पॉर्नस्टारला कॉकपिटमध्ये बसवलं

लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या कुवेत एअरवेजच्या फ्लाइटमध्ये पायलटनं एक्स पॉर्नस्टारला कॉकपिटमध्ये बसवलं. त्यावर नंतर खूप गोंधळ झाला. २४ वर्षीय की क्लो माफियानुसार, स्वत:ला 'नॉटी पायलट'

Updated: Jul 27, 2015, 07:46 PM IST
३०० प्रवासी, ३३ हजार फूट उंच, पायलटनं पॉर्नस्टारला कॉकपिटमध्ये बसवलं title=
Photo Source - Daily Mail Australia

हिथ्रो: लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या कुवेत एअरवेजच्या फ्लाइटमध्ये पायलटनं एक्स पॉर्नस्टारला कॉकपिटमध्ये बसवलं. त्यावर नंतर खूप गोंधळ झाला. २४ वर्षीय की क्लो माफियानुसार, स्वत:ला 'नॉटी पायलट'

म्हणवून घेणाऱ्या कॅप्टनच्या उपस्थितीत तिनं विमानच्या कंट्रोल सिस्टमसोबतही छेडछाड केली होती.

या मॉडेलनं घेतलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर झाल्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. कोणत्याही प्रवाशाला कॉकपिटमध्ये जाण्यास बंदी असते. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या मॉडेलचनं खरं नाव क्ला खान आहे. क्लाचं म्हणणं आहे की, ३०० प्रवाशांसोबत ३३ हजार फूट उंचावर विमान उडत असतांना पायलटचा व्यवहार पाहून ती स्वत: आश्चर्यचकीत होती. 

क्लोनं इंग्रजी वेबसाइट 'डेली स्टार'ला सांगितलं की, टेकऑफच्या ३० मिनीटांनंतर फ्लाइट स्टीवर्ड्सनं तिला आणि तिच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसायला बोलावलं होतं. क्लोनं सांगितलं की, तिनं कॉकपिटमध्ये प्रवाशांना बसण्यासंदर्भात आणि स्मोकिंगसंदर्भात विचारलं तर पायलटनं उत्तर दिलं की, तो स्वत:चे नियम स्वत: बनवतो. क्लो आणि तिच्या मैत्रिणीनं कॉकपिटमध्ये ४० सिगारेट पण प्यायल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.