पाकिस्तानी प्राध्यापकाने माणुसकीसाठी दिले प्राण

पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर स्थित बाचा खान विद्यापीठात आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले.

Updated: Jan 20, 2016, 07:58 PM IST
पाकिस्तानी प्राध्यापकाने माणुसकीसाठी दिले प्राण  title=

पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर स्थित बाचा खान विद्यापीठात आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला ज्यात अनेक विद्यार्थ्यांनी जीव गमावले. दहशतवादी निर्दयीपणे अंदाधुंद गोळीबार करत सुटले. 

पण, या सर्व प्रकरणात विद्यापीठात सहप्राध्यापक असणारे सय्यद हामिद हुसैन (३४) मात्र आज चर्चेचा विषय झाले. 

दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच हुसैन मात्र सावध झाले. त्यांनी त्वरेने स्वतःजवळचे पिस्तूल बाहेर काढले आणि दहशतवाद्यांकडे बंदूक रोखून गोळ्या झाडायला सुरूवात केली. हे घडत असताना अनेक विद्यार्थी तिथून सुखरूप निसटले. 

त्यांच्या या शौर्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. पण, सय्यद हामिद हुसैन मात्र दहशतवादयांच्या गोळ्यांना बळी पडले. एका विद्यार्थ्यासमोरच दहशतवादयांनी प्राध्यापकांना घेरले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आज इंटरनेटवर सर्वत्र त्यांना 'सलाम' केला जातोय.