नवी दिल्ली : पाकिस्तान कराची मध्ये राहणाऱ्या एका विचित्र महिलेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. महिलेचं डोकं पण लांडग्याचं शरीर असणाऱ्या या महिलेबद्दल अनेकांना उत्सुकता होती. या महिलेचं सत्य अखेर समोर आलंय.
काय आहे हा प्रकार :
'मुमताज बेगम' अस त्या महिलेचं नाव आहे. कराची चिडियाघरमध्ये त्या महिलेला बघण्यासाठी हजारो लोक येतात. आता तुम्हाला हे ऐकून थोड विचित्र वाटल असेल. पण काही तसंच आहे कारण, ह्या महिलेच्या डोक्याचा भाग हा मनुष्यासारखा आणि बाकी सर्व शरीराचा भाग कोल्ह्यासारखा आहे, असं सोशल मीडियावर वायरल होत होतं.
'फॉक्सी लेडी'चं सत्य?
खर तर मुमताज बेगम ही महिला नाही आहे, ना कोणता विचित्र प्रकार. हे सर्व पोट भरण्याचा आणि पैसा कमावण्याचा एक नवीन मार्ग आहे.. 'फॉक्सी लेडी' नावाने प्रसिद्ध असणारं मुमताज बेगम नावाचं अस एक पात्र आहे आणि हे काम ३५ वर्षाचे मुराद अली करतात.
काय आहे रहस्य
मुमताज बेगमचा हा रोल पहिला तिचे वडील करायचे. पण ते १८ वर्षांपूर्वी ते मृत्यू पावले. त्यानंतर ही जागा मुरादनं घेतली.
मुराद १२ तास एकाचं ठिकाणी, एकाच स्टाइलमध्ये बसून असतो. तिथे येणारे लोक १० रुपयाचं तिकीट घेऊन त्यांला बघायला येतात. लांडग्याच्या शरीराजवळ मुराद बसून असतो... त्याचा केवळ चेहरा लोकांना दिसतो... बाकीचा शरीराचा भाग मात्र टेबलाखाली असतो.
इथं या 'फॉक्सी लेडी'ला पाहायला येणारे लोक मुरादला अनेक प्रश्न विचारतात... आणि मुराददेखील त्यांची उत्तरं आनंदानं देतो... अनेक जण त्याच्यासोबत फोटोही काढतात.