अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

Updated: Jun 25, 2014, 09:03 PM IST
अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा title=

वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.

हा तारा सुमारे ११ अब्ज वर्ष जुना आहे. त्याचे हे वयोमान आकाशगंगे एवढेच आहे. हा तारा कार्बन आणि ऑक्सीजनच्या मिश्रणापासून तयार झाला असून तो हळूहळू अब्जावधी वर्ष थंड होत आहे.

या ताऱ्याला पाहणे हे खूप मजेशीर गोष्ट असल्याचे अमेरिकेच्या विसकोसीन मिलवावुकी विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड कालपान यांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.