पाकिस्तानी अभिनेत्रीची गोळी घालून हत्या

Updated: Aug 20, 2015, 08:47 PM IST
पाकिस्तानी अभिनेत्रीची गोळी घालून हत्या  title=

 

पेशावर :  पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात दहशतवाद्यांनी एका पश्तो अभिनेत्रीला तिच्या आईसमोर गोळ्या घालून हत्या केली. 

मुसरत शाहीन असे या अभिनेत्रीचे नाव असून आपल्या आईसह नौशेरा जिल्ह्यात खरेदीसाठी जवळच्या बाजारात जात होती. रस्त्यात बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या 

शाहीनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण गोळी लागल्यानंतर अति रक्तश्राव झाल्याने अभिनेत्रीचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.