435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 14, 2017, 07:56 PM IST
435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये  title=

इस्लामाबाद : तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी हल्क या नावानं अरबाब सध्या ट्रेन्ड होत आहे. 36 अंडी, साडेतीन किलो मटण आणि 5 लीटर दूध असा या हल्कचा खुराक आहे.

डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जाण्याची इच्छा अरबाबनं डेली मेल या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये क्वालिफाय होण्यासाठी मी डॉक्टरांच्या मदतीनं डाएट करत असल्याचंही अरबाबनं सांगितलं आहे. ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी गाड्या ओढतानाचा अरबाबचा एक व्हिडिओही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पाहा अरबाबच्या करामतीचा व्हिडिओ