पाकिस्तानात भूकंपानं हाहाकार; मृतांचा आकडा २०० वर

पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या ८० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ८० जण जखमी झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2013, 11:13 AM IST

www.24taas.com, पीटीआय, इस्लामाबाद/कराची
पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या २०० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ३०० जण जखमी झालेत.
अजूनही काही जण उद्ध्वस्त झालेल्या घरांखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. फ्रंटियर कोर, बलूचिस्तानच्या प्रवक्यांच्या म्हणण्यानुसार, बलूचिस्तान प्रांतातील आवारन जिल्ह्यात आत्तापर्यंत भूकंपामध्ये २०० जणांनी आपला जीव गमावलाय. जखमींना खुजदार स्थित सिव्हिल रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार आवारन आणि तुरबत जिल्ह्यात मोठी जिवीतहानी पाहायला मिळालीय.

आवारन आणि तुरबत जिल्ह्यात मातीचं घरं असल्यानं भूकंपाचे धक्के बसताच ही घरं कोसळली. त्याखाली दबून अनेकांनी आपले प्राण गमावले. आणखीही काही जण कोसळलेल्या मलब्याच्या खाली सापडण्याची शंका व्यक्त केली जातेय.
काश्मीर क्षेत्रात ऑक्टोबर २००५ मध्ये आलेल्या ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात जवळजवळ ७५,००० जणांनी प्राण गमावले होते. या भूकंपामुळे संपूर्ण क्षेत्रच उद्ध्वस्त झालं होतं. तर यावर्षी एप्रिल महिन्यात कराची आणि बलूचिस्तानातील काही भागांत झालेल्या भूकंपामध्ये ४० जण ठार झाले होते, हजारो घरं उद्ध्वस्त झाले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.