पाकिस्तानात सुरू होणार 'गाढव विकास योजना'

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकार गाढव विकास योजना आखणार आहे, या योजनेखाली गाढवांची प्रजनन क्षमता वाढवणारं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 02:59 PM IST
पाकिस्तानात सुरू होणार 'गाढव विकास योजना' title=

कराची : पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकार गाढव विकास योजना आखणार आहे, या योजनेखाली गाढवांची प्रजनन क्षमता वाढवणारं आहे, चांगली निरोगी गाढवं तयार करून ती चीनला पाठवणार आहे.

पाकिस्तानचा मित्र देश चीनलाही पाकिस्तानच्या गाढवांचीही मोठ्या प्रमाणात गरज आहे. कारण, या गाढवांच्या कातडीपासून औषध निर्मिती होते. तसेच अनेक विविध उपयोग गाढवांचे आहेत.

यासाठी आता पाकिस्तान सरकार गाढव पाळणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देणार आहे, अनुदान वाटप करून देशाला गाढवं विकून मोठा फायदा कमवण्याच्या इराद्यात आहे.

मात्र सोशल मीडियावर गाढव विकास योजनेवर जोरदार शेरेबाजी होत आहे. पाकिस्तानचा हा निर्णय गाढव या शब्दावर शेकला जात आहे.