पाकिस्तानात विमान अपघात, ४७ प्रवासी ठार

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पीके ६६१ विमानाला इस्लामाबादजवळ आबोटाबाद इथं अपघात झालाय.

Updated: Dec 8, 2016, 09:27 AM IST
पाकिस्तानात विमान अपघात, ४७ प्रवासी ठार title=

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या पीके ६६१ विमानाला इस्लामाबादजवळ आबोटाबाद इथं अपघात झालाय.

यामध्ये विमानात असलेले सर्व ४७ जण ठार झाल्याची शक्यता आहे. मृतांत धर्मगुरू झालेले पाकिस्तानातले प्रख्यात पॉप स्टार जुनेद जमशेद यांचाही समावेश असल्याचं समजतंय.

खैबर-पख्तुनवा प्रांतातल्या चित्राल इथून हे विमान इस्लामाबादकडे येत होतं. संध्याकाळी ४.४० च्या सुमारास हे विमान इस्लमाबादला उतरणं अपेक्षित होतं. मात्र तत्पूर्वी काही काळ विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर ते आबोटाबादला कोसळल्याचं स्पष्ट झालं. 

प्रवाशांच्या यादीमध्ये जुनेद तसंच त्यांच्या पत्नीचंही नाव आहे. ते चित्राल इथं धर्मप्रसाराच्या एका कार्यक्रमासाठी गेले होते.