क्योटो : भारत आणि जपान दरम्यान शनिवारी वाराणसीसाठी एक करार करण्यात आलाय. हा करार काशीच्या विकासासाठी करण्यात आलाय. यामुळे, भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये एक चांगली सुरुवात झालीय, असं म्हणता येईल.
या करारामध्ये काशीला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे. उभय दोशांमध्ये शहर विकास करारानुसार हस्ताक्षर करण्यात आलेत. या करारा दरम्यान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो एबे हेदेखील उपस्थित होते. शिंजो खास मोदींनी भेटण्यासाठी टोक्योहून इथं उपस्थित झाले होते.
मोदी इथं उपस्थित झाल्यानंतर लगेचच या करारावर हस्ताक्षर करण्यात आले. जपानमधील भारताच्या राजदूत दीपा वाधवा आणि क्योटोचे मेअर दायसाकू कादोकावा यांनी या करारावर हस्ताक्षर केले. मोदी आपल्या दोन दिवसीय जपान यात्रेदरम्यान इथं उपस्थित झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.