www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
अमेरिकन अधिकाऱ्यांनी ऑनलाईन चाईल्ड पॉर्न सेवा देणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अधिकाऱ्यांनी गुप्त स्वरूपात वेबसाईट चालविणाऱ्या १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
या आंतरराष्ट्रीय टोळीकडून चालविण्यात येणाऱ्या वेबसाईटवर उपलब्ध व्हिडिओंपैकी २५० हे व्हिडिओ लहान मुलांचे होते. यामध्ये सर्वाधिक व्हिडिओ हे अमेरिकेतील मुलांचे आहेत. गुप्तपणे चालविण्यात येणाऱ्या वेबसाईटवर २७,००० ग्राहक उपलब्ध होते. यामधील अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेरिकन अधिकारी डॅनिअल रॅगस्डॅल यांनी रॉयटर या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आमच्या इतिहासात बालशोषण खटल्यामध्ये लहान मुलांचा असा उपयोग केल्याचे दिसून आलेले नाही. स्थानिक आणि सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून एका आंतरराष्ट्रीय टोळीचा भांडाफोड करण्यात यश आले आहे.
अमेरिकेतील ३९ राज्यांमधील तीन ते १७ वर्ष वयोगटातील लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २५१ पिडितांपैकी ब्रिटनमधील २३, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बेल्झियम मधील लहान मुलांचा समावेश आहे. या संकेतस्थळावर उत्तेजन देणारे आणि कामोत्तेजक व्हिडिओ आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.