मॅथ्यू चक्रीवादळाने हैतीमध्ये 283 जणांचा बळी

दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळनं हैतीमध्ये आतापर्यंत 283 जणांचा बळी घेतलाय. तर एकूण बळींचा आकडा 300च्या वर गेलाय. 

Updated: Oct 7, 2016, 09:59 AM IST
मॅथ्यू चक्रीवादळाने हैतीमध्ये 283 जणांचा बळी title=

वॉशिंग्टन : दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळनं हैतीमध्ये आतापर्यंत 283 जणांचा बळी घेतलाय. तर एकूण बळींचा आकडा 300च्या वर गेलाय. 

आज हे वादळ अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्याच्या किनाऱ्यावर आदळलंय.  त्यामुळे प्रशासनानं तब्बल 20 लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

मॅथ्यू चक्रीवादळानं हैती हे बेट वजा राष्ट्र संपूर्णपणे जमीनदोस्त केलंय. त्याचप्रमाणे या वादळाचा दक्षिण अमेरिकेतल्या क्युबालाही मोठा फटका बसलाय.  

सध्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यालगत ताशी 130 किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. या भयावह वादळात पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सुप्रसिद्ध वॉल्ट डिस्ने वर्ल्ड बंद करण्यात आलाय. वादळाचा जोर आणखी 24 तास कायम राहणार आहे.