वॉशिंग्टन : पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानने म्हटलंय की, अमेरिका आता विश्वशक्ती नाहीय, जर अमेरिकेने भारत आणि काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानच्या विचारांना महत्व दिलं नाही, तर पाकिस्तान चीन किंवा रशियाच्या बाजूने जाणार असल्याचं पाकिस्तानने अमेरिकेला म्हटलं आहे.
काश्मीरच्या मुद्यावर शरीफ यांचे विशेष दूत मुशाहिद हुसैन सैय्यद 'अमेरिकेचे थिंक टँक' या चर्चेत सामिल होते, ही चर्चा अटलांटिक काऊंसिलमध्ये चर्चा होती, यावेळी समारोपाच्या सैय्यद म्हणाले, 'अमेरिका आता जागतिक शक्ती नाही, अमेरिका या शक्तीपासून अस्ताकडे जातेय, अमेरिकेबद्दल आता आधी सारखं विचार करणं सोडून द्या.'
सैय्यद यांनी यावेळी इशारा दिला आहे, अमेरिकेने पाकिस्तानच्या काश्मीरविषयी विचारांना प्राधान्य दिला नाही, तर आम्ही चीन आणि रशियाच्या बाजूने जाऊ.