अमेरिकेनंतर आता पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलियातही जलवा!

अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे. सिडनीच्या ऑलफोन्स अरेना या प्रसिद्ध इव्हेंट सेंटरवर 17 नोव्हेंबरला मोदी सभा घेणार आहेत. तब्बल 27 हजार अनिवासी भारतीय यावेळी उपस्थित असतील. 

Updated: Nov 13, 2014, 01:56 PM IST
अमेरिकेनंतर आता पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलियातही जलवा! title=

सिडनी: अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे. सिडनीच्या ऑलफोन्स अरेना या प्रसिद्ध इव्हेंट सेंटरवर 17 नोव्हेंबरला मोदी सभा घेणार आहेत. तब्बल 27 हजार अनिवासी भारतीय यावेळी उपस्थित असतील. 

सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कचं प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर मोदींनी गाजवलं होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या क्रमांकाचा अरेना काबीज करण्यास पंतप्रधान सज्ज झालेत. ऑस्ट्रेलियामध्ये या भाषणाची प्रचंड उत्सूकता आहे. या कार्यक्रमाची सर्व तिकिटं कधीच विकली गेली असली, तरी अद्याप चौकशी होतेय. 

मोदींसोबत हात मिळवता येईल का, फोटो काढता येईल का? असे फोनही आयोजकांना वारंवार येतायत. या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण असेल ते मिस इंडिया ग्लोबल राहिलेली सौंदर्यवती राशी कपूर. ती या संपूर्ण कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.