'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!'

 अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांची बुधवारी धावती भेट झाली. या भेटीदरम्यान ओबामा यांनी मोदी यांना 'मॅन ऑफ ऍक्शन' असं म्हटलं.

Updated: Nov 13, 2014, 10:58 AM IST
'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!'  title=

नेपिडो :  अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांची बुधवारी धावती भेट झाली. या भेटीदरम्यान ओबामा यांनी मोदी यांना 'मॅन ऑफ ऍक्शन' असं म्हटलं.

"अध्यक्ष ओबामा यांच्याकडून शाही भोजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत- 'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!' असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी भोजनानंतर ट्विट केले आहे. 

म्यानमारचे अध्यक्ष दीन सीन यांच्या वतीने ‘असीआन‘ परिषदेसाठी आलेल्या जागतिक नेत्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले. 

बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची मागील सहा आठवड्यांत दुसऱ्यांदा भेट झाली. म्यानमारची राजधानी नेपिडो येथे शाही संध्या भोजनावेळी ही भेट झाली. यापूर्वी अध्यक्ष ओबामा यांनी मोदी यांच्यासाठी २९ सप्टेंबर रोजी वॉशिंग्टनमध्ये शाही भोजनाचे आयोजन केले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.