विमानात प्रसुती वेदना होतात तेव्हा...

नायजेरियाहून लंडन जाणाऱ्या एका विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली, कारण विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने मुलाला जन्म दिला.

Updated: May 4, 2014, 06:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
नायजेरियाहून लंडन जाणाऱ्या एका विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली, कारण विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने मुलाला जन्म दिला.
31 वर्षाच्या उजुन्हा नेह ओजे या नायजेरियाची राजधानी अबूजाहून हिथ्रो एअरपोर्टला जात होत्या. उजुन्हा या विमानात प्रवास करत होत्या, आकाशात 36 हजार फूट उंचीवर विमान होतं आणि त्यावेळेस उजुन्हा यांना प्रसृती वेदना होऊ लागल्या. उजुन्हा यांना प्रीमॅच्युयर डिलेव्हरी झाली.
ब्रिटीश एअरवेजच्या विमानाची बॅलेरिक आयलँडच्या डे मेलोर्सवर इमरजन्सी लँडिंग करण्यात आली. उजुन्हा यांना सोमवारी हॉस्पिटल डिस्जार्ज देणार आहे. बाळाची अवस्था नाजूक असल्याने, बाळ आयसीयूत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.