भूकंपानंतर पाकिस्तानात तीन नव्या बेटांचा उदय!

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या भूकंपामुळे तिथं समुद्रकिनाऱ्यावर तीन नव्या बेटांचा अचानक उदय झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 28, 2013, 11:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या भूकंपामुळे तिथं समुद्रकिनाऱ्यावर तीन नव्या बेटांचा अचानक उदय झालाय. बंदरांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वादरच्या समुद्रकिनाऱ्यावर यातील एक बेट तयार झालंय तसंच बलुचिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर आणखी दोन छोटी छोटी द्वीप निर्माण झालेत.
पाकिस्तानचे डब्ल्यू. एफ. डब्ल्यू. एफचे तंत्रज्ञान सल्लागार मोहम्मद मोअज्जम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वादर तटावर निर्माण झालेल्या बेटाचा व्यास 600 फूटांचा आहे तसंच त्याची उंची 30 फूट आहे. या बेटामधून गॅस निघत असल्याचीही त्यांनी माहिती दिलीय. हे बेट दगड आणि मातीनं बनलंय. इतर दोन छोटी बेटं ओरमारा शहराच्या नजीक आहेत. खान यांच्या माहितीनुसार, या बेटांचा आकार 30-40 फूट आणि 2-3 फूट उंच आहेत. या बेटांमधूनही गॅस बाहेर येत आहे.

असं असलं तरी, पाकिस्तानच्या समुद्रतटावर बेट निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 1945 मध्ये पाकिस्तानात दोन बेटांची निर्मीती झाली होती. यातील एक बेट दोन किलोमीटर लांब आणि दुसरं अर्धा किलोमीटर लांब होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.