नवी दिल्ली : पाकिस्तान अधिकृत काश्मीर क्षेत्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे केलेला हाताला पाकिस्तान राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांनी 'थॅक्यू' म्हटलंय.
पाकिस्तान आपली मदत स्वत: करण्यासाठी सक्षम आहे... पाकला कोणत्याही मदतीची गरज नाही... असं पाकिस्ताननं म्हटलंय. इतकंच नाही पाकिस्ताननं भारतालाच मदत हवी असल्यास मदत देण्याची नम्रतापूर्वक तयारी दाखवलीय.
'सहानुभूतीपूर्वक पाक अधिकृत काश्मीर भागातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन मदतीचा हात पुढे करणारं 7 सप्टेंबर रोजीचं तुमचं पत्र मिळालं... आमच्या मदतीकरता दिलेला हा मदतीचा हात विचार करण्याजोगा आहे... आणि या आपातकालीन परिस्थिती तो आमच्यासाठी तितकाच मौल्यवानही आहे' असं म्हणत पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींचे आभार मानलेत.
'भारतातील परिस्थितीही काही वेगळी नाही... तिथंही मोठ्या प्रमाणावर जिवितहानी आणि वित्तहानी झालीय. या परिस्थितीशी सामना करणाऱ्या सर्वच कुटुंबांसोबत आमच्या प्रार्थना आहेत. आम्हीही शक्य होईल ती मदत भारताला करण्यासाठी सदैव तयार आहोत' असं शरीफ यांनी म्हटलंय.
यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी मानवतेला धरून पाक अधिकृत काश्मीर भागात पूरग्रस्तांना हरएक संभव मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली होती. जम्मू-काश्मीरच्या पूर प्रभावित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी पाकला मदत पुरवण्याची तयारी दाखवली होती.
'आपातकालीन परिस्थितीत, पंतप्रधानांनी या भागातील लोकांना शक्य होईल ती मदत पुरविण्याची तयारी केलीय. तसंच पाकिस्तानला गरज असेल तर भारत सरकार त्यांच्या क्षेत्रातील जनतेसाठीही मानवता म्हणून मदत पुरविण्यासाठी तयार आहे' असं पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर आलेल्या पत्रकात म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.