ट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीला ट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण मिळाले आहे. रविवारी झालेल्या क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यातल्या दुसऱ्या वादफेरीवर याच विषयाचं वर्चस्व राहिले.

Reuters | Updated: Oct 11, 2016, 10:57 PM IST
ट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण title=

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीला ट्रम्प यांच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे वळण मिळाले आहे. रविवारी झालेल्या क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यातल्या दुसऱ्या वादफेरीवर याच विषयाचं वर्चस्व राहिले.

हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांचं खरं रूप यामुळे उघड झाल्याचा टोला लगावला, तर चवताळलेल्या ट्रम्प यांनी बिल क्लिंटन यांची जुनी लफडी बाहेर काढून पलटवार केला. आपण तर फक्त बोललो, क्लिंटन तसे वागले आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी तोफ डागली आहे.

ट्रम्प आणि क्लिंटन यांच्यातला तणाव इतका टोकाला गेलाय, की या वादफेरीसाठी समोरासमोर आल्यावर त्यांनी हस्तांदोलनही केलं नाही. क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यातली ही दुसरी वादफेरी सुरू होण्यापूर्वी काही तास डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले.

बिल क्लिंटन यांच्या कथित लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांची पत्रकार परिषदच त्यांनी घेतली. यामध्ये क्लिंटन यांनी आपल्यावर कसे अत्याचार केले याचा पाढाच चार महिलांनी वाचला.