न्यूयॉर्क : नासा २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर लोकांना पाठवणार आहे. मात्र नासा यासाठी अंतराळ यात्रींना असं जेवण देणार आहे, जे ह्यूमन वेस्टनेच तयार होणारं असेल. मात्र ह्यूमन वेस्टपासून पुन्हा अंतराळ यात्रींचं जेवण कसं तयार करायचं, हे शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांना १ कोटी ३४ लाख रूपये देण्यात येणार आहेत.
क्लेमलन यूनिवर्सिटीच्या केमिकल आणि बायोइंजीनियरिंग विभागाचे प्रोफेसर मार्क ब्लेनर यांनी म्हटलंय की, बाहेर काढण्यात आलेल्या कार्बन डायऑक्साईडचा वापर जेवण बनवण्यासाठी होऊ शकतो, ब्लेनर म्हणाले, जर तुम्हाला जास्त वेळ लोकांना अंतराळात पाठवायचं असेल, तर तुम्ही बाजारातून खरेदी केलेलं जास्त सामन नाही घेऊन जाऊ शकतं'.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.