नासाच्या 'न्यू होरायझन्स'नं पाठवला प्लुटोचा पहिला फोटो

सूर्यमालेतला सर्वात दूर असलेला लघुग्रह प्लुटो आता आपल्याला अधिक जवळचा झालाय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या न्यू होरायझन्स या मोहीमेअंतर्गत प्लुटोचं सर्वात जवळचं छायाचित्र मिळालंय. 

Reuters | Updated: Jul 15, 2015, 09:06 AM IST
नासाच्या 'न्यू होरायझन्स'नं पाठवला प्लुटोचा पहिला फोटो title=

लारेल: सूर्यमालेतला सर्वात दूर असलेला लघुग्रह प्लुटो आता आपल्याला अधिक जवळचा झालाय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या न्यू होरायझन्स या मोहीमेअंतर्गत प्लुटोचं सर्वात जवळचं छायाचित्र मिळालंय. 

तब्बल ३ अब्ज मैलांवरून आलेल्या या छायाचित्रामुळे प्लुटोचा अधिक अभ्यास संशोधकांना करता येणार आहे. नासाच्या सायन्स मिशनचे प्रमुख जॉन ग्रुन्सफेल्ड यांनी मानवी इतिहासातली ही अत्यंत महत्त्वाची घटना असल्याचं म्हटलंय.

आज प्लुटोचे आणखी फोटो पृथ्वीवर येतील, अशी आशा व्यक्त केली जातेय. न्यू होरायझन्स हे यान प्लुटोजवळून गेल्यानंतर १३ तासांनी नासाच्या नियंत्रण कक्षापर्यंत हा फोटो पोहोचला आणि शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. 

न्यू होरायझन्स मोहीम नासानं साडेनऊ वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यावेळी प्लुटो हा सूर्यमालेतला एक ग्रह आहे, असाच समज होता. मधल्या काळात तो ग्रह नसून क्युपर बेल्टमधला, म्हणजे नेपच्युनच्या पलिकडे असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातला सर्वात मोठा लघुग्रह असल्याचं अभ्यासाअंती सिद्ध झालं.

पाहा पहिला व्हिडिओ - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.