अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला!

आजपासून नऊ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मैडिसन स्क्वेअर’वर उपस्थित असलेल्या लोकांना तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं... आणि यंदाच्या अमेरिका दौऱ्यातही नरेंद्र मोदी याच मेडिसन स्क्वेअरवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत... 

Updated: Sep 25, 2014, 01:07 PM IST
अमेरिका दौऱ्यात मोदी घेणार एक मजेशीर बदला! title=

न्यूयॉर्क : आजपासून नऊ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मैडिसन स्क्वेअर’वर उपस्थित असलेल्या लोकांना तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं होतं... आणि यंदाच्या अमेरिका दौऱ्यातही नरेंद्र मोदी याच मेडिसन स्क्वेअरवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत... 

फरक फक्त एव्हढाच की, तेव्हा मेडिसन स्क्वेअरवर मंचावरची मोदींची खुर्ची रिकामी होती... आणि ते थेट गुजरातहून इथं जमलेल्या जवळपास 7,000 लोकांना संबोधित करणार आहेत. पण, आता परिस्थिती बदलललीय... आता नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यादरम्यान मेडिसन स्क्वेअरवर प्रत्यक्षात हजारो लोकांना संबोधित करणार आहेत.  

न्यूयॉर्कमध्ये राहणारे एनआरआय याबद्दल बोलताना म्हणतात, 'अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसाठी हा एक मजेशीर बदला असेल. 2005 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि न्यूयॉर्कला येणार होते, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी एका कम्युनिटी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. पण, त्यांचा व्हिजा रद्द झाल्याची अचानक बातमी आली... आम्हाला समजत नव्हतं की काय करावं... आम्ही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पैसेही खर्च केले होते आणि लोकही मोदींना ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे, आम्ही मंचावर मोदींसाठी एक खुर्ची रिकामी ठेवली... आणि मोदींनी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमच्याशी संवाद साधला'.

मोदींच्या आयोजित अमेरिका दौऱ्यात प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये जवळपास 18,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी काही भारतीयांनी एक खास गाणंही तयार केलंय. ‘बिगुल बजा है जीत का’ अशा या गाण्यांच्या बोलावर नरेंद्र मोदींचे वेगवेगळे छायाचित्र प्रेक्षकांसमोर येत राहतील. एका ग्लोबल नेत्याच्या स्वरुपात मोदींना ही जनता पाहत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.