सात वर्षांत पहिल्यांदाच कमी होणार डिझेल दर?

डिझेल ग्राहकांसाठी ही खुशखबर... सात वर्षांत पहिल्यांदाच डिझेलचे दर घटण्याची शक्यता निर्माण झालीय.

Updated: Sep 9, 2014, 12:19 PM IST
सात वर्षांत पहिल्यांदाच कमी होणार डिझेल दर? title=

नवी दिल्ली : डिझेल ग्राहकांसाठी ही खुशखबर... सात वर्षांत पहिल्यांदाच डिझेलचे दर घटण्याची शक्यता निर्माण झालीय.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दीर्घकाळानंतर 100 डॉलरपेक्षा कमी झाल्यानं डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झालीय. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही दिलासा मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

डिझेलच्या दरांत सबसिडी हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय त्यामुळे डिजेलचे दर 'बाजार किंमती'च्या बरोबर आहेत. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयानं मजबूत स्थिती पकडलीय. तेल कंपन्या यामुळे डिझेलचे दर कमी करण्याबाबत विचार करत आहेत.  

एका तेल कंपनीच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी कंन्यांच्या होणाऱ्या समीक्षा बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. डिझेलच्या किंमतींबाबत अंतिम निर्णय मात्र सरकार घेईल. कारण, डिझेलवर अद्यापही थोड्याफार प्रमाणात सरकारचं नियंत्रण आहे... पेट्रोलप्रमाणे डिझेलच्या किंमती ठरवण्याचे अधिकार संपूर्णत: बाजाराकडे सोपवण्यात आलेले नाहीत. 

दुसरीकडे, सरकार डिझेलचे दर नियंत्रण मुक्त करण्यावर गंभीरतेनं विचार करत आहे. यानंतर, डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या किंमतींसोबत जोडले जातील. सध्या, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 99 डॉलरच्या आसपास आहे. अनेक दिवसांननंतर ही स्थिती पाहायला मिळालीय. चीनसारख्या मोठ्या देशांकडून मागणी कमी झाल्यानं ही शक्यता निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.