www.24taas.com, स्टॉकहोम्स
स्टॉकहोम्स येथे चालू असलेल्या जागतिक जल सप्ताह 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. गुजरात राज्यात 2003 साली नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ज्योतिग्राम योजनेचा उल्लेख करण्यात आला. या योजनेमुळे गुजरातमधील खेडेगावांना 24 तास पाणी आणि वीज पुरवठा होत राहातो. तसंच अनुदान आणि व्यावसायिक भाव यांचं गणितही या संदर्भात मोदींनी उत्तम सोडवल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं.
अन्नाची नासाडी कशी टाळता येईल, तसंच कृषीक्षेत्रात पाण्याचा वापर वाढावा आणि यासाठी गुंतवणूक वाढावी यावरील उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. जगात 900 दशलक्ष लोक उपासमारीशी लढत आहेत, तर 1.5 अब्ज लोक पोटाच्या वर जेवत आहेत. जगातील एकूण 1/3 अन्नाची नासाडी होत आहे.
अन्नाची नासाडी थांबवणं गरजेचं असून ते शक्य झाल्यास पाण्याचीही बचत होऊ शकेल असं मत होमग्रेन यांनी व्यक्त केलं. टॉर्गनी होमग्रेन हे या जागतीक जल सप्ताहाचे आयोजक तसंच आंतरराष्ट्रीय जल संस्थेचे कार्यकारी संचालकही आहेत.