धक्कादायक! अंडरवॉटर शुटींगदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू

अंडरवॉटर शूट दरम्यान एका अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तैवानमध्ये घडसी आहे. शुटींग करतांना पाण्यामध्येच या अभिनेत्रीला अटॅकर आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. 

Updated: May 19, 2016, 05:51 PM IST
धक्कादायक! अंडरवॉटर शुटींगदरम्यान अभिनेत्रीचा मृत्यू title=

तैवान : अंडरवॉटर शूट दरम्यान एका अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तैवानमध्ये घडसी आहे. शुटींग करतांना पाण्यामध्येच या अभिनेत्रीला अटॅकर आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. 

ताइपे टाइम्सच्या माहितीनुसार, ओलिविया कू नाव असलेल्या या अभिनेत्रीला जेव्हा फायरफाइटर्स आणि कोस्ट गार्डने पाण्यातून बाहेर काढलं तो पर्यंत ती जिवंत होती पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी सुरु आहे.

एका व्यक्तीने सांगितलं की, या दरम्यान सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना केल्या गेल्या नव्हत्या. ओलिविया हिला ४ वर्षांची मुलगी देखील आहे. ओलिविया डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीचे खासदार चिऊ यी यिंग यांची चुलत बहिण देखील आहे.