...पुन्हा गायब झालं इजिप्तचं विमान!

इजिप्तच्या 'इजिप्त एअर'चं एक विमान अचानक गायब झालंय. MS804 हे विमान बेपत्ता झालंय. 

Updated: May 19, 2016, 11:46 AM IST
...पुन्हा गायब झालं इजिप्तचं विमान! title=

पॅरिस : इजिप्तच्या 'इजिप्त एअर'चं एक विमान अचानक गायब झालंय. MS804 हे विमान बेपत्ता झालंय. 

हे विमान पॅरिसहून काहिराला जात होतं. या विमानात ६९ जण असल्याचं सांगण्यात येतंय. विमानात एकूण ५९ प्रवासी आणि १० क्रू मेंबर होतं. इजिप्त एअरनं ही माहिती दिलीय. 

MS804 बोईंग ७३७-८०० नं गुरुवारी सकाळी ५.०९ वाजता 'चार्ल्स द गॉल' इथून उड्डाण केलं. परंतु, काही वेळातच ते रडारवरून गायब झालं. कंट्रोलरुमशीही संपर्क तुटलाय. हे विमान पूर् भूमध्य सागराच्या वर ३७ हजार फूट उंचावर होतं. या विमानाचा शोध सुरू आहे.