इबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा...

लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये. 

Updated: Oct 6, 2014, 02:09 PM IST
इबोलानं मृत झालेला व्यक्ती जिवंत होतो तेव्हा... title=

लायबेरिया: लाइबेरियामध्ये डॉक्टरांनाही धक्का बसला जेव्हा इबोलानं मृत झालेला व्यक्ती पुन्हा उठून बसला. हा अजिब किस्सा घडलाय लायबेरियाची राजधानी मोनरोविओच्या हॉस्पिलटलमध्ये. 

'एबीसी न्यूज' चॅनेलच्या रिपोर्टनुसार त्या व्यक्तीचं प्रेत दफन करण्यासाठी नेलं जात होतं. अंत्यविधीसाठी नेलं जाण्याआधी विषाणूचं इतरांना संक्रमण होऊ नये म्हणून प्रेताला ब्लीच लावण्याचं काम सुरू केलं. ब्लीच लावल्यानंतर प्रेत बॅगेत ठेवलं. 

मात्र सर्व जण घाबरले जेव्हा त्या प्रेतानं आपला हात हलवला. भीतीनं सर्व टीम सदस्य ओरडले ‘तो जिवंत आहे, मेलेला नाही’. 

 त्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, लायबेरियामध्ये इबोला व्हायरसमुळं जवळपास २,००० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.