मलेशियाचे गायब विमान आता मानवरहित पानबुडी शोधणार

मलेशियाचे गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अनेक देशातील यंत्रणा कामाला लागली असताना, आता हिंन्द महासागरात तळातून येणाऱ्या ध्वनीचा शोध ऐकण्याचा प्रयत्न बंद करण्यात येणार आहे.

Updated: Apr 14, 2014, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पर्थ
मलेशियाचे गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अनेक देशातील यंत्रणा कामाला लागली असताना, आता हिंन्द महासागरात तळातून येणाऱ्या ध्वनीचा शोध ऐकण्याचा प्रयत्न बंद करण्यात येणार आहे. तसेच आता ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी एक मानवरहित पानबुडी काम करणार आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कूठलाच ध्वनी ऐकू न आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य शोधक समन्वयक एयरचीफ मार्शल एंगस ह्यूस्टन यांनी सांगितलं की, "आम्हाला गेल्या आठवड्यापासून कूठलाही संकेत मिळाला नाही. आता पाण्याच्या आत जाण्याची वेळ आली आहे. विमानाच्या शोधाचे 35 दिवस उलटून गेले आहेत. सीएनएनच्या अनूसार ब्लूफिन-21 तैनात करण्यात येईल. याच्या बाजूला साइड स्कॅन सोनार लावलेल. असेल. ही सोनार सिस्टम आधी ध्वनीचे रुपांतर प्रकाशात करुन ध्वनि परावर्तनाने चित्र निर्माण करते.
ह्यूस्टन पूढे म्हणाले, "प्रत्येक वेळी ही पानबुडी तळाशी जाण्यासाठी दोन तास लागतील. ही पानबुडी सोळातास पाण्याखाली शोध घेईल, नंतर पानबुडीला बाहेर येण्यासाठी दोनतास लागतील. मिळालेल्या माहितीचा डेटा डाउनलोड करण्यासाठी चारतास लागतील.
महत्वाची गोष्ट म्हणजे या पानबुडीच्या सहाय्याने शोध घेणे, ही एक लांब प्रक्रिया आहे. तसेच कदाचित या प्रक्रियेतून काहीच हाती देखील लागणार नाही, असे मार्शल एंगस ह्यूस्टन यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.