दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी

ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबत १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये द्विपक्षीय चर्चा केली

Updated: Nov 12, 2015, 10:00 PM IST
दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी; ब्रिटनच्या संसदेत मोदी title=

नवी दिल्ली : ब्रिटनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमरून यांच्यासोबत १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असहिष्णुतेशी निगडीत एका प्रश्नावर बोलताना मोदींनी 'वेगवेगळ्या विचारांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. मूल्यांच्या विरुद्ध जाऊन केलेली  कोणतीही गोष्ट आम्हाला स्वीकार्य नाही' असं म्हटलंय. 

आणखी काय म्हटलंय मोदींनी... 
- भारतात ब्रिटन हा तिसरा सर्वात मोठा गुंतवणुकदार देश आहे.
- स्टार्टअपमध्ये भारत लवकरच नवी क्रांती घडवून आणणार आहे.
- सुरक्षित अफगाणिस्तान ही आमची प्राथमिकता
- दहशतवादाचं रुप बदलंय
- दहशतवादाला थारा देणाऱ्यांची ओळख व्हायला हवी
- दहशतावादाविरुद्ध एकत्र येऊनच लढा द्यायला हवा
- ब्रिटन सोबत असेल तर कमाल होईल
- सबका साथ, सबका विकास म्हणजे नागरिकांनी समृद्ध व्हावं

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.