अमेरिकेत लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची हत्या

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Reuters | Updated: Aug 26, 2015, 09:48 PM IST
अमेरिकेत लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची हत्या title=

न्यूयॉर्क : अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

डब्लयूडीबीजे ७ न्यूज चॅनेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोनेटात लाईव्ह मुलाखत सुरु होती. यावेळी २४ वर्षीय एलिसन पार्कर आणि २७ वर्षीय कॅमेरामन एडम वार्ड या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

लाईव्ह प्रसारणाच्यावेळी गोळीबाराचा आवाज आला. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, या पत्रकारांवर का गोळ्या घालण्यात आल्या त्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.