मलेशियन विमान हल्ला : काय आहे हे 'बक मिसाईल सिस्टम'

रशियाच्या सीमेच्या जवळच्याच युद्ध प्रभाविक युक्रेनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा मलिशियन एअरलाईन्सच्या एका विमानाला दहशतवाद्यांनी आपला निशाणा बनवलं. या विमानावर कथित स्वरुपात ‘बक मिसाईल’च्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला होता. 

Updated: Jul 18, 2014, 04:58 PM IST
मलेशियन विमान हल्ला : काय आहे हे 'बक मिसाईल सिस्टम' title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : रशियाच्या सीमेच्या जवळच्याच युद्ध प्रभाविक युक्रेनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा मलिशियन एअरलाईन्सच्या एका विमानाला दहशतवाद्यांनी आपला निशाणा बनवलं. या विमानावर कथित स्वरुपात ‘बक मिसाईल’च्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला होता. 

असं मानलं जातंय की, रशियाचं विमान समजून दहशतवाद्यांनी या विमानाला आपला निशाणा बनवलंय. मलेशियन एअरलाइन्सच्या या विमान ‘बोईंग 777’ एमस्टर्डमहून कुआलालांपूर जात होतं. यामध्ये 280 प्रवासी आणि चालक दलातील 15 सदस्य उपस्थित होते. या हल्ल्यात विमानात उपस्थित असलेल्या सगळ्या म्हणजेच 295 जणांचा मृत्यू झालाय. महत्त्वाचं म्हणजे, हिंद महासागरात मलेशियन विमान ‘एमएच 370’ रहस्यमयरित्या गायब झाल्याच्या घटनेला आता चार महिने पूर्ण झालेत आणि त्यानंतर आता या विमानावर हल्ला करण्यात आल्याचं उघड झालंय. 

युक्रेनच्या सीमेत दहशतवाद्यांनी जमीनीहून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल प्रणाली ‘बक’चा वापर करून विमान पाडलंय. रशियानं ‘बक मिसाईल’ची निर्मिती सोव्हियत संघाची निर्मिती होत असताना 1979 मध्ये केलं होतं. बक मिसाईल लॉन्चरच्या साहाय्यानं 72 हजार फूटपर्यंत हवेत मारा केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, मलेशिया विमानाला 33,000 फूटांच्या उंचीवर असताना उडवण्यात आलंय. 

कसं असतं हे बक मिसाईल... 
- 17, जानेवारी 1972 रोजी मिसाईल बनवण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. 

- बक मिसाईल सिस्टमला पूर्व सोव्हियत यूनियन आणि रशियन फेडरेशननं डिझाईन केलंय. या मिसाईल्सना क्रुझ मिसाईल आणि अज्ञात विमानांवर हल्ला करण्याच्या दृष्टीनंच डिझाईन करण्यात आलंय.

-‘बक मिसाईल सिस्टम’ 50 फूटांपासून ते 72,000 फूटांच्या उंचीपर्यंत आपल्या लक्ष्याला निशाणा बनवू शकतं.

- बक मिसाईलला कोड भाषेत ‘एसए 11 गॅडफ्लाय’ असं म्हटलं जातं... 

- बक मिसाईल सिस्टमनं तीन-तीन मिसाईल टार्गेटवर एकत्रच सोडले जाऊ शकतात. त्यामुळे, लक्ष्याला भेदण्यासाठी यामुळे मोठी शक्यता निर्माण होते.

- ‘एसए-11’च्या एका रॉकेटवर तीन मिसाईल लावल्या जातात आणि त्यांची दिशा निर्धारित करण्यासाठी रडार प्रणालीचा वापर केला जातो. याच पद्धतीच्या दुसऱ्या रॉकेटवर लक्ष्य निर्धारित करणारं ‘स्नो ड्रिफ्ट रडार’ही उपलब्ध असतं. 

- बक मिसाईल लॉन्चरमध्ये आधुनिक रडार उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या मिसाईल वेगवेगळ्या दिशांमध्ये सोडल्या जाऊ शकतात. 

- या मिसाईल लॉन्चरच्या आधुनिक मॉडलच्या साहाय्यानं ड्रोन विमानांनाही निशाणा बनाया जा सकता है. रशियानं असे मिसाईल सिस्टम सीरियासहीत अनेक देशांना विकलेत.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.